*भय इथलं संपत नाही* - अभिजीत कोतोलीकर

*मुंबईच्या मायानगरीत प्रत्येक सेंकदागणित इथला माणूस धावत असतो .घड्याळातल्या काट्याबरोबर जगतो . इथली लोकल ट्रेन म्हणजे या नगरीची जीवनवहिनीच जणू .! मुंबई मध्ये सकाळी लोकल पकडून वेळेत ऑफीसला पोहचणे आणि परत संध्याकाळी तीच लोकल पकडून आपल्या घरी सुखरूप पोहचण म्हणजे तारेवरची कसरतच जणू... सकाळी उठून ऑफीसला जाऊन आपण परत सुखरूप घरी पोहचू की नाही ? हा भला मोठा प्रश्न त्याच्या डोक्यात सदैव निर्माण झालेला असतो. हा प्रश्न उराशी घेउनच तो जगत असतो .
*‌सकाळी नेहमी प्रमाणे मुबंई जागी झाली आणि वेळेत* ऑफीस ला कॉलेज ला पोहचण्याची गडबड सुरू झाली ...नेहमी प्रमाणे मध्य रेल्वेच परेल स्टेशन आणि पश्चिम रेल्वेच एलफिन्स्टन स्टेशन गजबजलेले होत .या दोन्ही स्टेशन एकाच ब्रिटिश कालीन पुलाने जोडले आहे .त्यामुळे नेहमी ह्या ब्रिजवरती गर्दी पहायला मिळते.आज सकाळी ब्रिजच्या दोन्ही बाजूला स्टेशनवर जाणाऱ्याची प्रचंड गर्दी .परेल आणि एलफिन्स्टन स्टेशन ला एकाच वेळी दोन्ही ट्रेन थांबल्या आणि प्रचंड गर्दी जमा झाली .त्यात पाऊसाची भर पडली.बाहेर पडणाऱ्या धो धो पावसामुळे प्रवाशांनी ब्रिजचाच आसरा घेतला.त्यातले काही जण ब्रिज वर तर काही जिन्यावर उभे राहिले .तर काही जण गर्दीतून मार्ग काढत स्वतः ला लवकर जायच आहे. म्हणून घाई करत होते !!!ये भाई चल ना!!!! ...ओये चल रे जल्दी ...!!!!चलो चलो गाडी आ गई !!. अशा नेहमीच्या हाका देत ब्रिज चढ़त होता;उतरत होता . अचानक ब्रिजच्या वरच्या बाजूला विजेच शॉर्ट सर्किट झाल आहे .ब्रिज पडला .पत्रा कोसळला अशा अफवा पसरताच नागरिकांनी प्रचंड गोंधळ केला. गर्दीत स्वतः पुढे पुढे जाण्यात रममान असणारा मुंबईकर क्षणाचाही विचार न करता स्वतः चा जीव वाचण्यासाठी सैरावैरा धावू लागला . प्रचंड दंगा सुरू झाला .या मोठ्या दंग्यांत चेंगराचेंगरी सुरू झाली .ब्रिज वरून नागरिक पायरीवर पडले तर काही स्वतः च जीव वाचवत खाली पडलेल्या व्यक्तीना पायदळी तुडवत होते .काही तर जिन्याच्या साइड पट्यात अडकून पडले ...क्षणात प्रचंड गोंधळ माजला होता .. जीव वाचवण्याची आर्त हाक कोणालाच कोणाची ऐकू येत न्हवती ..जे व्हायच तेच झाल 4 जणाचा म्रुत्यू झाल .बाकी गंभीर जखमी झाले त्याना उपचारांसाठी के एम हॉस्पिटल ला दखल केले पण उपचारां आधीच ते आपल्या प्राणाला मुखले. 22 जणांनी आपला जीव गमावला ..हे सगळ ऐकताना बोलताना मन सुन्न होत कारण या 22.जणात कोणाची आई .कोणाच बाप .कोणाचा मुलगा मुलगी अशी सगळी नाती एका क्षणा संपली होती .‌घटनेन समाजातील प्रत्येकाल विचार करायला भाग पाडला आहे .की या दुर्घटनेत नेमकी चूक कोणाची प्रशासनाची ??? जनतेची ???रेल्वेची ? की त्या बिचाऱ्या जीर्ण ब्रिजची ?असंख्य प्रश्न थैमान घालत आहेत .
इंग्रजांनी भारतात विविध ठिकाणी ब्रिज पुूल* बांधले ..ते निघून गेले पण गेल्यावर ज्या ज्या पुलंाची वैधता संपली ते त्यानी पत्र व्यवहार करून सांगितल ..पण निर्दयी कोणत्याच सरकारने त्याकडे लक्ष दिले नाही कोणत्याच पर्यायी पुल ब्रिज बांधला नाही .म्हणून महाड सारखे पुल जातात .असे किती फूल ब्रिज जातीत याची तीळमात्र कल्पना सरकारला नाही ..दुर्घटना घडली की आम्ही दुखात सामील आहोत ..कुटुंबाला अकुम येवढी मदत बस्स संपल ...जबाबदारीतून मुक्त ....पण हे होऊ नये म्हणून प्रयत्न किती तर झिरो ...देशाला बुलेट ट्रेन ची गरज नाही. तर आहे ती रेल्वे व्यवस्था बळकट करायची खरी गरज आहे ..आहे त्या सुविधानीट व योग्य अशा पुरवण्याची नितांत गरज आहे .कधी या सगळ्याची आपल्या निर्दयी सरकारला जाग येणार आहे ? आणि जर ती येणार नसेल तर या झोपलेल्याना जाग करण्याची वेळ आत्ता आली आहे .तरच होणाऱ्या दुर्घटना टळतील.नाहीतर वर्षानुवर्ष असेच नाहक बळी जातील .
मित्रहो याही पुढे जावून माणसाची एक गोष्ट या सर्व घटनेला कारणीभूत आहे ती म्हणजे माणसाची हरवत चाललेली "संवेदनशीलता' दिवसेंदिवस माणूस असंवेदनशील बनत चालला आहे .भावना शून्य झाला आहे .त्याला समाजातील कोणत्याच व्यक्ती बदल सहानुभूती रहिली नाही ..कळत न कळत छोटीशी चूक करतो आणि अनेकांना त्याची मोठी किंमत मोजवी लागते .याच चालत बोलत उदाहरण म्हणजे ही एल्फिंस्टन ची दुर्घटना ! एक छोट्याशा अफवाने आज 22 जणांचे प्राण घेतले ! दसऱ्याच्या 9 व्या दिवशी उत्साही वातावरणात बाहेर पडलेल्या आणि उद्या पासून 3दिवस सुट्टी आहे या आनंदात असणाऱ्या या सर्वाचाच आनंद नियतीने आज कायमचा काढून घेतला ...असंख्य नात्याना आज तीनं पोरक केल .मित्रहो आत्ता तरी जागे होऊया विनाकारण अफवा पसरवण रोखुया! अफवा परवाऱ्याला शिक्षा देउया .नाहीतर एक दिवस प्रत्येकाला या चुकाची भली मोठी किंमत मोजवी लागेल .म्हणूनच स्वतः तील माणूसपणाला हाक देऊन एक कर्तव्यदक्ष नागरिक बनूया ...माणसातील माणूसपण जपूया ......आणि होणाऱ्या दुर्घटना टाळूया .....
🖋 अभिजीत कोतोलीकर
संज्ञापण व पत्रकारिता विभाग
मुंबई विद्यापीठ

Comments

Popular posts from this blog

आयुर्वेद घरेलु उपचार पध्दती: गोखरु Gokharu

आयुर्वेद घरेलु उपचार पध्दती: बहुउपयोगी एरंडेल Erandel